कोअर बँकींग प्रणालीचा वापर करून दसरियाच्या सर्व शाखांचे व्यवहार एकमेकांशी जोडणारी यंत्रणा विकसीत केली आहे. दसरिया ग्राहक दसरियाच्या कोणत्याही शाखेमध्ये जावून आपला व्यवहार पूर्ण करू शकेल. त्याचप्रमाणे दसरियाच्या कोणत्याही शाखेमध्ये होणारा प्रत्येक व्यवहार एकमेकांशी जोडला जाईल व या प्रणालीद्वारे सर्व व्यवहारांचे नियंत्रण मुख्यालयातून करता येईल.