थकबाकी वसुलीमध्ये दसरियाने आजपर्यंत अनेक विक्रम केलेले आहे. कायदेशीर परंतु कठोर वसुली हेच दसरियाचे यशाचे गमक आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. या रिकव्हरी पॅटर्नची प्रभावी अंमलबजावणी करण्यसाठी 'ऑनलाईन रिकव्हरी कंट्रोल रूमची' निर्मिती नवीन वास्तूत करण्यात आली आहे. या रिकव्हरी कंट्रोलद्वारे कोणत्याही शाखेतील कर्जदाराचा एक जरी हप्ता थकला तरी त्याला SMS द्वारे किंवा पत्राद्वारे तात्काळ सूचना देणेची अॅटोमॅटीक तरतूद करण्यात आली आहे. तसेच थकबाकीदारांना ठरावीक दिवसात कायद्याप्रमाणे 'अ' व 'ब' नोटीसा, डिमांड नोटीस, जंगम जप्ती नोटीस, स्थावर मालमत्ता जप्ती नोटीस तसेच कायदा कलम १०१ प्रकरणे दाखल करण्यासाठी लागणारी कागदपत्रे प्रिंट करणारे सॉफ्टवेअर विकसीत केलेले आहे. या सॉफ्टवेअरद्वारा सर्व शाखाचे थकबाकीदारांना नोटीसा पाठविणे किंवा कारवाई करण्यासंबंधीचे नियोजन करता येणार आहे. यापूर्वी देखील कारवाईच्या नोटीसा ठरावीक मुदतीत न गेल्यास कर्मचारी व अधिकारी प्रती रोज दंडाची कारवाई करण्याची तरतूद केलेली होती. तसेच या कारवाईमध्ये पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यास पदाधिकाऱ्यांवरसुद्धा दंडाची कारवाई तरतूद केलेली आहे. या रिकव्हरी कंट्रोल रूममुळे सावताची वसुली अत्याधुनिक प्रणालीने तत्पर होईल.